Wednesday, May 26, 2010

स्वगत्

देह सांडूनी
विश्व सोडूनी
जा येथुनी आता,
जा जेथे
प्रेमच नांदे
दुःख नमवे माथा.

हरित तृणांचे
प्रतीक मनाचे
जेथे दिसेल तुजला,
जा जेथे
मुक्त मनाचा
सुर्य येई उदयाला.

रमतो कैसा
येथे, बघ
आचार आति हा झाला;
जा जेथे
स्वप्न-मालेचा
कल्प येई बहराला.

No comments:

Post a Comment