एका सरीने ऐसे यावे
भिजवून मला चिंब करावे,
गत् स्मृतींच्या आठवणींनी
सारे मन मोहरून जावे.
एका सरीने ऐसे यावे
मनातील शब्द ओठांस द्यावे,
हात मझ्या हाती गुंफ़ुन-
खुल्या अभाळी गात सुटावे.
एक सर ऐसी आली
कानी काही सांगून गेली,
एक आठवण ताजी झाली
नयनी-कंठी दाटून गेली.
No comments:
Post a Comment